लाडक्या बहिणीसाठी बाजारात "आपले मुख्यमंत्री" एकनाथ शिंदे राख्यांचा ट्रेंड

    10-Aug-2024
Total Views | 54

Rakhi
 
ठाणे (Raksha Bandhan 2024) : लाडक्या बहिणीसाठी बाजारात "आपले मुख्यमंत्री" एकनाथ शिंदे  राख्यांचा ट्रेंड जोषात आहे. लाडकी बहीण योजना आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विविध मुद्रा आणि सुलेखन रेखाटलेल्या राख्या ठाण्याच्या बाजारात दिसत आहेत.
 
श्रावण महिना म्हटला की सण-उत्सवांची पर्वणी. याच महिन्यात १९ ऑगस्टला भाऊ- बहिणीच्या अतूट नात्याला उद्धृक्त करणारा सण म्हणजे 'रक्षा बंधन' आहे. रक्षा बंधनसाठी बाजारात रंगीबेरंगी विविध आकारांच्या आणि ढंगांच्या राख्या पहावयास मिळतात.
 
राखी पौर्णिमा सण जसजसा जवळ येतो तसतसे बाजारात राख्यांचा बाजार फुलुन जातो. गेल्यावर्षी असलेला ट्रेण्ड यावर्षी नसतो, तसेच, बाजारात कोणत्या राख्यांचा बोलबाला आहे. याची कुजबूज महिला तसेच बच्चे कंपनीत सुरु होते.
 
या आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेल्या राख्यांची चलती होती परंतु गतवर्षी पासुन ठाण्याच्या बाजारपेठेत ठाणेकर मुख्यमंत्र्यांची छबी असलेल्या "आपले मुख्यमंत्री" या ट्रेंडच्या राख्या विक्रीस दिसत आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121