ट्रेनमधील अलार्म चैनचा गैरवापर वाढला

मुंबईत सर्वाधिक ४३८७ इतकी प्रकरणे

    03-Jul-2024
Total Views | 30

train chain pulling


मुंबई, दि.३ :
रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ही अलार्मची साखळी आणीबाणीच्या परिस्थितीत खेचण्यासाठी डिझाइन केलेली आहे. फक्त ट्रेनचे लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर (गार्ड) यांना अलर्ट करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही सुविधा देण्यात येते. मात्र, या सुविधेचा गैरफायदा वाढला असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यापैकी ४३८७ इतकी सर्वाधिक प्रकरणे ही मुंबई विभागात नोंदवली गेली आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी उशीरा पोहोचणे, उतरणे/मध्यम स्थानकांवर चढणे इत्यादी क्षुल्लक कारणांसाठी या सुविधेचा गैरवापर करत आहेत. अलार्म चेनचा गैरवापर हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१नुसार दंडनीय गुन्हा आहे. यामध्ये अटकेची कारवाईही करण्यात येऊ शकते. एक वर्षापर्यंत कारावास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेचा समावेश असू शकतो. एप्रिल-२०२३ ते जून-२०२४ या कालावधीत २८ जून २०२४ पर्यंत मध्य रेल्वेने अलार्म चेनच्या गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या १४१नुसार ९६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून ६३.२१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.


विभागनिहाय प्रकरणे

विभाग   प्रकरणे    अटक    दंड वसूल

मुंबई       ४३८७    ३७४१   २३.४७ लाख

भुसावळ २९३१      २८२४   २१.७६ लाख

नागपूर    १७०६     १४०४     ८.७१ लाख

पुणे          १९९२     १४४०    ७.७३ लाख
  
सोलापूर      ४१८     २४८      १.५४ लाख
अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121