किल्ले गावठाण परीसरात मैदान व उद्यान विकसित करण्याची मागणी

    19-Jul-2024
Total Views | 40
विकास
 
नवी मुंबई : बेलापूर किल्ले गावठाण परिसरात जेष्ठ नागरिक व मुलांसाठी खेळाचे मैदान व उद्यान विकसित करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता नासिर हुसेन यांनी पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या कडे केली आहे बेलापूर किल्ले गावठाण परिसरात लहान मुलांकरिता व जेष्ठ नागरिकांनसाठी एकही उद्यान नाही. त्यामुळे येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
 
या परिसरात काही भुमाफिया बेकायदेशीरित्या अनधिकृतरित्या बांधकाम करून शासकीय जमीन गिळकृत करण्याच्या प्रयत्न करत आहेत. ह्याच जमिनीवर बेलापूर किल्ले गावठाण परिसरातील नागरिकांसाठी महापालिकेकडून एक उद्यान तयार करण्यात यावे जेणेकरून येथिल नागरिकांना एक उद्यान मिळेल व भूमाफियाचा जमीन गिळकृत करण्याचा डाव आहे तो ही उधळला जाईल. येथील मोकळ्या भूखंडावर, बेलापूर किल्ले गावठाण परिसरातील नागरिकांसाठी उद्यान तयार करण्यात यावे. अशी मागणी नासिर हुसेन यांनी पालिका आयुक्तां कडे केली आहे
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121