कर्नाटक सरकारने जिहादींसमोर आत्मसमर्पण करणे थांबवावे : डॉ सुरेंद्र जैन

    01-Jun-2024
Total Views | 42

VHP on Karnatak Sarkar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
कर्नाटकच्या (VHP on Karnatak Sarkar) मंगळुरू येथे हजारो मुसलमानांनी रत्यावर उतरून नमाज अदा केला. तासंतास रस्त्यावर ट्राफिक जाम झाले. यात अनेक शाळकरी मुलं, रुग्णवाहिका अडकली गेली. समाजाने यास विरोध केल्याचे सोशल मिडियावरून दिसले. याच कारणास्तव कर्नाटक पोलिकांनी सुओ मोटो केस दाखल करून यास रोखण्याचा प्रयत्न केला. उघड्यावर नमाज अदा करणे हे म्हणजे नमाज नसून फसाद (दंगल) आहे, एकप्रकारे शक्तीप्रदर्शन आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने जिहादींसमोर आत्मसमर्पण करणे थांबवावे, असे म्हणत विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ सुरेंद्र जैन यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

हे वाचलंत का? : कोपरगावात गाडे कुटुंबीयांच्या शेतजमिनीवर जिहाद्यांचे आक्रमण!

मात्र आता तक्रार मागे घेतल्याचा प्रकार समोर आला असल्याचे सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, राजकीय दबावापोटी तक्रार मागे घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर आरोपींवर योग्य कारवाई व्हावी यासाठी पोलिसांकडे मागणी करणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि प्रांत मंत्री शरण यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. हे अस्विकारार्ह आहे. तक्रार मागे घेतल्यास विहिंपला राज्यव्यापी आंदोलन करण्यास मजबूर व्हावे लागेल.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121