कोपरगावात गाडे कुटुंबीयांच्या शेतजमिनीवर जिहाद्यांचे आक्रमण!

    01-Jun-2024
Total Views |

Kopargaon Land Jihad 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
कोपरगाव (Kopargaon Land Jihad) ब्राह्मण गावात जिहाद्यांनी हिंदू कुटुंबाच्या शेतजमिनीवर आक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनधिकृतपणे कागदपत्रे तयार करून ५.५ एकर जमिनीवर ताबा सांगत त्यावर शेड टाकून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी गाडे कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

हे वाचलंत का? : नाचता येईना अंगण वाकडे! काँग्रेस पक्षाच्या 'त्या' निर्णयावर बावनकुळेंचा टोला

सुभाष गाडे, पुंडलिक गाडे यांच्या म्हणण्यानुसार १९६८ पासून शेतजमीन आपल्या मालकीची असून वडिलोपार्जित ते कसत आले आहेत. शेतजमिनीचे मुळ कागदपत्र आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेताचा शेतसारा व पाणीपट्टी देखील भरत आले आहेत. ४ मे रोजी सांडू नसिर शेख याने सहकुटुंब रात्री शेत नांगरून त्यावर १० बाय १० चे शेड उभे केले आणि त्यावर सीसीटिव्ही कॅमेरे बसवले.

आपल्या आजोबांची जमीन असल्याचा दावा सध्या सांडू नसिर शेख यांनी केला आहे. जे आतमध्ये येतील त्यांना मारू अशी धमकीदेखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे कुटुंबाला धोका असल्याची रितसर तक्रार गाडे कुटुंबीयांकडून कोपरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.