मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना UAE सरकारकडून नुकताच गोल्डन व्हिसा प्रदान करण्यात आला. गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर रजनीकांत यांनी अबू धाबीमधील BAPS स्वामीनारायण संस्थेने बांधलेल्या हिंदू मंदिरात जाऊन दर्शन देखील घेतले. BAPS स्वामीनारायण संस्थेने रजनीकांत यांचा व्हिडिओ शेअर केला असून यात दोन पुजारी त्यांना मंदिराबद्दल माहिती देताना दिसत आहेत.
रजनीकांत यांनी युएई सरकराचे व्हिडिओच्या माध्यमातून आभार देखील मानले आहेत. “अबू धाबी सरकारकडून प्रतिष्ठित UAE गोल्डन व्हिजा मिळाल्यामुळे मला खूप सन्मानार्थक वाटतंय. या व्हिजासाठी आणि सर्व सहकार्यासाठी मी अबू धाबी सरकारचे आणि माझा चांगला मित्र युसूफ अली यांचे मनापासून आभार मानतो.'
दरम्यान, अबू धाबी कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि अबू धाबी सरकारच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष मोहम्मद खलिफा अल मुबारक यांच्या उपस्थितीत रजनीकांत यांना गोल्डन व्हिजा देण्यात आला.