कोकणात जाण्यासाठी बोरिवलीहून रेल्वे सुटणार!

हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

    17-May-2024
Total Views | 49

kokan



मुंबई, दि.१७ :
नायगाव - जुचंद्र असा नवा बायपास टाकून बोरीवली हे कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे आयोजित कोकणवासियांच्या मेळाव्यात दिली. याचवेळी हार्बर मार्ग बोरीवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
उत्तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांनी या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बोरीवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे, गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेमार्ग बोरीवलीला जोडण्यात यावा तसेच वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु करण्यात यावी अशा तीन मागण्या केल्या आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्यासाठी ८२६ कोटी रूपयांची तर नायगाव - जूईचंद्र बायपाससाठी १७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मेळाव्यात दिली.
"बोरीवली हेच आता माझे पहिले घर आहे आणि माझ्या हातून काही चांगले घडावे यासाठी मी येथे आलो आहे. उत्तर मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. बोरीवलीने मला, माझ्या कुटुंबाला आणि आम्ही बोरीवलीकरांना आमच्या जीवनात सामावून घेतले आहे. उत्तर मुंबईतील प्रचारात मुंबईकरांनी दाखवलेल्या प्रेमाने आपण भारावून गेलो आहे. या मुंबईकरांकडून जो प्रेमाचा वर्षाव होत आहे ते सर्व मोदीजींसाठी आहे आणि ते थेट त्यांच्याकडे जात आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विचार करून केंद्र सरकार मत्स्य संपदा योजनेसह अनेक योजना राबवीत आहे. येत्या काळात अशा अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाईल", अशी ग्वाही पियूष गोयल यांनी दिली.
उत्तर मुंबईतील कोकणवासीयांशी संवाद साधून रेल्वेबाबतच्या त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या मेळाव्याला उपस्थित राहिले होते. या मेळाव्याला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, मनीषा चौधरी, सुनील राणे, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, विजय गिरकर उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121