पुढील आठवड्यात गुंतवणूकीसाठी ' हे ' दोन आयपीओ खुले होणार

तीर्थ गोपीकॉन व डीसीजी वायर व केबल्स आयपीओ गुंतवणूकदारांसाठी हजर

    06-Apr-2024
Total Views | 83

IPO
 
 
मुंबई: पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी आली आहे. पुढील आठवड्यात तीर्थ गोपीकॉन (Teerth Gopicon) व डीसीजी वायर व केबल्स (DCG Wire and Cables) या दोन कंपन्यांचे आयपीओ (Initial Public Offering) बाजारात दाखल होणार आहेत.
 
१) तीर्थ गोपीकॉन (Teerth Gopicon) - या कन्स्ट्रक्शन कंपनीचा आयपीओ ८ ते १० एप्रिल या तीन दिवसात बिडींगसाठी खुला असणार आहे. कंपनीच्या समभागांचे वाटप १२ एप्रिल २०२४ पर्यंत नक्की होणार आहे. हा आयपीओ एनएससी व बीएससी या दोन्ही बाजारात नोंदणीकृत होणार आहे. कंपनीने प्राईज बँड १११ रुपये प्रति समभाग निश्चित केला आहे. कमीत कमी कंपनीला १२०० समभाग खरेदी करावे लागणार आहे म्हणजेच एकूण १३३२०० किंमतीचे समभाग खरेदी करावे लागतील. याबाबत कमीत कमी २ गठ्ठे (Lot) खरेदी करावे लागतील.
 
कंपनीने माहिती दिल्याप्रमाणे इंटरअँक्टिव्ह फायनांशियल सर्विसेस ही संस्था या आयपीओसाठी बुक लिंडिग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत. बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड हा कंपनीचा रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. कंपनीकडून पात्र गुंतवणूकदारांना समभाग वाटप १२ एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे. १६ एप्रिलपर्यंत समभाग बाजारात नोंदणीकृत (Listing) होतील.
 
एकूण निधी उभारणीतील ५० टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.कंपनीचे प्रमोटर ( संस्थापक) महेशभाई कुंभानी व चंद्रिकाबेन कुंभानी, पल्लव कुंभानी आहेत. ही मध्यप्रदेश स्थित कंपनी मुख्यत्वे रोड कन्स्ट्रक्शन, सिवेज, वॉटर सप्लाय अशा विविध प्रकारच्या सेवा पुरवते.
 
कंपनीच्या अंतर्गत असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) , ३१ जानेवारी २०२४ पर्यंत १३७१९.७९ रूपये होत्या. कंपनीला करोत्तर नफा (Profit After Tax) ३९१४.८७ लाख रुपये झाला होता. कंपनीचे एकूण बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) १३३.२ कोटी रुपये आहे. कंपनीने माहिती दिल्याप्रमाणे वर्किंग कँपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी या आयपीओतीद निधीचा वापर केला जाणार आहे.
 
२) डीसीजी केबल्स व वायर्स लिमिटेड (DCG Wires and Cables Limited) - डीसीजी कंपनीचा आयपीओदेखील ८ ते १० एप्रिल दरम्यान गुंतवणूकदारांना बिडींगसाठी खुला होणार आहे. डीसीजी केबल्स कंपनी वायर्स व केबल्स उत्पादनात कार्यरत आहे. ही कंपनी एनएससी (NSE) (SME) विभागात १६ तारखेपासून नोंदणीकृत केली जाणार आहे.
 
या कंपनीचे कमीतकमी गुंतवणूकदारांना १२०० समभाग विकत घ्यावे लागतील. कंपनीकडून प्राईज बँड १०० रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकीसाठी कमीत कमी १२०००० रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. कमीत कमी २ गठ्ठे (Lot) (२४०० समभाग) खरेदी करावे लागतील. इंटरअँक्टिव्ह फायनांशियल सर्विसेस ही संस्था या आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.
 
आयपीओत प्रति समभाग दर्शनी मूल्य (Face Value) १० रूपये निश्चित केले गेले आहे. प्रत्येक समभागांची किंमत १०० रुपये असणार आहे.एकूण ४९९९२०० समभाग फ्रेश इश्यूतून गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे.
 
कंपनीकडून पात्र गुंतवणूकदारांना १२ एप्रिलपर्यंत समभागांचे वाटप करण्यात येईल. अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना १५ एप्रिलपर्यंत पैसे परत मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.१६ एप्रिलपर्यंत कंपनीचे समभाग १६ तारखेपासून एनएससी एस एम ई वर नोंदणीकृत (लिस्टिंग) होणार आहे.
 
देवांग पटेल, हर्षदभाई पटेल व उषाबेन पटेल हे कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहेत.कंपनीचे अहमदाबाद व वडोदरा येथे वायर व केबल्स बनवण्याचे प्रकल्प आहेत. ३९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कंपनीचे असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) ६१५२.१३ लाख रुपये आहेत व कंपनीचा ३१ मार्च २०२३ पर्यंत करोत्तर नफा (Profit After Tax) १५३३.८२ लाख रुपये आहे.
 
कंपनीचे बाजारी भांडवल १८१.५ कोटी रुपये इतके आहे. कंपनीने सांगितलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील निधीचा वापर इमारत उभारणीसाठी भांडवली खर्च, वर्किंग कँपिटल गरजेसाठी, सर्वसाधारण कामासाठी, इतर खर्चासाठी करण्यात येणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121