लखनौ : ज्ञानवापी परिसरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर निकाल देणारे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांना धमकीचे फोन येत आहेत. न्यायाधिशांच्या म्हणण्यानुसार त्यांना गेल्या काही दिवसात १४० कोड नंबरवरुन धमकीचे फोन येत आहेत. त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहुन यासंदर्भात तक्रार दिली आहे. या तक्रारीची प्रत जिल्हा न्यायाधिशांकडेही देण्यात आली आहे.
रवि कुमार दिवाकर सध्या बरेली येथील फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये न्यायाधीश आहेत. काही काळापूर्वी त्यांनी २०१० च्या दंगलीप्रकरणी मौलाना तौकीर रझा मुख्य आरोपी असलेल्या खटल्याची सुनावणी केली होती. या प्रकरणी त्यांनी तौकीर रझाविरुद्ध वॉरंट जारी केले आणि पोलिसांना तौकीर रझाला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतर तौकीर रझाचा खटला कोर्टातून ट्रान्सफर झाला आणि त्यानंतर मौलानाला सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाला, पण दरम्यानच्या काळात न्यायाधीशांना परदेशातून फोन येऊ लागले.
न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पोलिस अधिक्षक सुशील घुले यांना पत्र लिहुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सायबर सेलकडुन चौकशी करण्यात येणार आहे. त्याथुन समोर येणारे तथ्य लक्षात घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
परदेशी नंबरवरुन न्यायाधीश रवी कुमार यांना धमकी मिळण्याची ही पहीली वेळ नाही. ज्ञानवापीच्या खटल्यात निकाल सुनावल्यानंतर त्यांना धमकी देणारे पत्र आले होते. तुम्हाला सांगतो की, आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून न्यायाधीशांना अशाप्रकारे धमकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी ज्ञानवापीच्या वादग्रस्त रचनेबाबत निर्णय दिला असताना त्यांना धमकीचे पत्र आले होते. पत्रात लिहिले होते.या धमकीनंतर प्रशासनाने न्यायाधीशांची सुरक्षा अधिक कडक केली होती. ९-१० पोलिसांना नेहमी त्याच्यासोबत राहण्यास सांगितले होते. बरेलीला बदली झाल्यानंतरही दोन सुरक्षा कर्मचारी नेहमी त्यांच्यासोबत असतात.