‘चाललो नवस फेडायला!, स्वप्नील निघाला कोकणात

    19-Mar-2024
Total Views | 56
 
 
दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगांवकर यांचा बहुचर्चित आणि प्रतिक्षित नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाच्या चित्रिकरणासा सुरुवात झाली आहे.
 

swapnil post 
 
मुंबई : नवस फेडण्यासाठी सामान्य माणसांना काय काय करावं लागतं याचं उत्तम उदाहरण देणारा चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha). दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी २००४ साली ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणून मनोरंजनाची आणखी एक पायरी सर केली होती. आजही २० वर्षांनी हा चित्रपट, त्यातील प्रत्येक पात्र लोकं आवडीने पाहतात. काही दिवसांपुर्वी याच चित्रपटाचा पुढचा भाग ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha) हा चित्रपट येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी केली होती. याच चित्रपटाबद्दल अभिनेता स्वप्नील जोशी याने महत्वाची अपडेट शेअर केली आहे.
 
हे वाचलंत का? - स्वप्नील जोशीचे चाहत्यांसाठी सरप्राईज, म्हणाला “जगातील सर्व स्त्रियांना…”  
 

swapnil post 
 
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात झाली. पहिल्या भागात सगळे कलाकार लालपरीने प्रवास करत गणपती पुळ्याला आपापला नवस फेडायला गेले होते. आता पुढच्या भागात सर्व प्रवासी नवस फेडायला कोकणात जाणार असल्याचे समोर येत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी याने इन्स्टाग्रामवरुन स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यात तो आणि सचिन पिळगांवकर एकत्र रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसत आहे. या स्टोरीला कॅप्शन देताना स्वप्नील म्हणाला आहे की, “चाललो नवस फेडायला! ‘नवरा माझा नवसाचा २'”. यावरून हे दोघंही कोकणात जात असून पुढचा नवस तिथे फेडणार असे वाटत आहे.
 

swapnil post 
 
दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात पुन्हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी दिसणार आहे. याशिवाय स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, निवेदिता सराफ, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फळी असणार आहे. त्यामुळे पुढचा नवस फेडण्याचे नेमके ठिकाण, पद्धत आणि धमाल मस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत यात शंकाच नाही.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121