बोरीवलीत मचान कोसळल्याने तिघांचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

    12-Mar-2024
Total Views |
under-construction-building-collapses



मुंबई :    बोरीवलीत बांधकामाधीन इमारतीचे मचान कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना समोर आली आहे. कल्पना चावला चौक, सोनी वाडी, बोरिवली येथे मंगळवार, दि. १२ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार येथील २४ मजल्याच्या बांधकामाधीन इमारतीच्या १६व्या मजल्यावरील मचान कोसळल्यामे सदर दुर्घटना घडली.
 
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका आणि संबंधित स्थानिक यंत्रणांनी लागलीच बाचावकार्य सुरू केले आणि ४ जखमींना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती संबंधित रुग्णालय प्रशासनाने दिली. मनोरंजन समतदार (४२), शंकर बैद्य (२५) आणि पियुष हरदार (३८) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत तर सुशील गुप्ता (३५) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

१६ व्या मजल्याचा मचान कोसळला
 
सोनी वाडी परिसरातील कल्पना चावला चौकात दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. "प्राथमिक माहितीनुसार, २४ मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरील मचान कोसळले. परिणामी, या दुर्घटनेमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे आतापर्यंत तीन मजुरांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच शहर अग्निशमन दल, पोलीस, महापालिका कर्मचारी यांच्यासह १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे.
 

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121