रांची : भारत व इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथील झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंड संघाने ७ बाद ३०२ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने संयमी खेळी करत शतक ठोकले. त्याने २२६ चेंडूंचा सामना करत ९ चौकारांसह १०६ धावांवर खेळत आहे.
दरम्यान, भारताने सामन्याच्या सुरूवातीला गोलंदाजांनी पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला. भारतीय कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या आकाश दीपने ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या पहिल्या तीन महत्त्वाच्या खेळाडूंना स्वस्तात माघारी धाडले. तर मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर, दुसऱ्या दिवशीच्या सुरूवातीस भारतीय संघ कोणत्या रणनीतीने मैदानात उतरतो यावर संपूर्ण सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.