हल्दवानी हिंसाचार! पोलिसांची कट्टरपंथीयांविरुद्ध धडक कारवाई

    18-Feb-2024
Total Views | 116
haldwani 
 
डेहराडून : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी शहरात दि. ८ फेब्रुवारीला हिंसाचार उसळला होता. बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केल्याने हा हिंसाचार झाला. या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांकडून शस्त्रे हिसकावण्यात आली आणि पोलिस ठाणे पेटवून देण्यात आले.
 
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींची ओळख पटवून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत एकूण ५८ दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांकडून लुटलेले पेट्रोल बॉम्ब आणि मॅगझिनही जप्त करण्यात आले आहे. या कारवाईची माहिती नैनिताल पोलिसांनी दि. १७ फेब्रुवारी २०२४ शनिवारी दिली. दि. ८ फेब्रुवारीच्या हिंसक घटनेत वनभुलपुरा पोलीस ठाण्यात ३ एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
पोलिसांची पथके तयार करण्यात आली असून जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून अनेक आरोपींची ओळख पटली असून आता त्यांचा शोध सुरू आहे. आता याप्रकरणी आणखी १४ दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. नैनिताल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या १४ आरोपींपैकी पोलिसांनी लुटलेली मॅगझिन शारिक आणि मोहम्मद दानिश यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे. हे मॅगझिन हिंसाचाराच्या वेळी सरकारी रायफल हिसकावण्याच्या प्रयत्नात लुटण्यात आलेल्या पीएसी जवानाचे होते.
 
मोहम्मद फैजानवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून ४ पेट्रोल बॉम्ब जप्त केले आहेत. फैजान आणि शहजाद यांनीच मुखणी पोलिस ठाण्याच्या अधिकृत वाहनावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीत दंगलीत सहभागी असलेल्या त्याच्या इतर साथीदारांचीही नावे समोर येऊ शकतात.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121