कोका कोलाच्या व्यवसायात २०२३ ला मोठी वाढ
भारत ब्राझीलचा एकूण ब्रँड विक्रीत मोठी वाटा
मुंबई: कोका कोला या वैश्विक शीतपेय ब्रॅण्डला आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये भरघोस फायदा झालेला आहे. एकूण व्यवसायातील शीतपेयांच्या विक्रीत २०२३ मध्ये मोठी वाढ झाली आहे. याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना, कोका कोला कंपनीचे चेअरमन जेम्स क्वेन्सी यांनी, ब्रँडला आर्थिक वर्ष २३ मध्ये भरघोस वाढ मिळाली आहे असे सांगितले.
डिसेंबर तिमाहीत निव्वळ महसूलात ७ टक्क्याने वाढ झाली असून ती १०.८ अब्ज युएस डॉलरपर्यंत वाढली आहे. सेंद्रिय वाढीत १२ टक्के वाढ झाली आहे.२०२३ मध्ये महसूलात ६ टक्क्याने वाढ झाली आहे ज्याची किंमत ४५.८ अब्ज युएस डॉलरपर्यंत आहे. कंपनीने आपल्या जाहीरातनाम्यात सांगितल्याप्रमाणे, विकसित व आगामी विकसनशील बाजारात २ टक्के वाढ झाली आहे. रशियातील बिझनेस बंद केल्याने २०२२ मध्ये भारत ब्राझीलमधील व्यवसायात मोठी वाढ झाली आहे.'
भारत व ब्राझीलमधील वाढीमुळे विकसनशील बाजारात कोकाकोला ब्रँड विक्रीत ४ टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या कोकाकोलासाठी भारत क्रमांक ५ चे मोठे मार्केट आहे. ही विक्री युनिट केसमध्ये मोजली जाते. युनिट केस म्हणजे एकूण शीतपेय युनिटची केलेली विक्रीमुळे एकूण व्यवसायात होणारी वाढ असते. एकूण कोकाकोला करिता आशियाई बाजार लाभदायक ठरला आहे. आशिया पॅसिफिक बाजारात कोका कोलाच्या महसूलात २ टक्क्याने वाढ झाली आहे.
कोका कंपनी कडून अपेक्षित महसुलात ६ ते ७ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षी कोकाकोलाने आपले बॉटलिंग ऑपरेशन्स राजस्थान, बिहार, बंगाल, ईशान्य पूर्व भारतात हस्तांतरित केले होते