दरभंगा : श्रीराम विवाह यात्रेवर बिहार येथील दरभंगा येथे काही कट्टरपंथींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यात्रा जशी मशिदीजवळ पोहोचली, तसे तिथे शोभायात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर ही दगडफेक करण्यात आली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशातच घटनास्थळी पोलीस तैनात झाले असल्याचे वृत्त आहे.
दरवर्षी विवाह पंचमीनिमित्त बाजितपुर आणि तरौनी पोलीस ठाणे हद्दीत भगवान श्रीराम यांच्या विवाह यात्रेचे आयोजन करण्यात येते. ही यात्रा तरौनी गावातून बाजितपुरकडे जात होती. यावेळी बाजितपुर येथे असलेल्या मशिदीजवळून शोभायात्र जात होती. त्यावेळी काही कट्टरपंथींनी शोभायात्रेवर दगडफेक करत उन्माद केला.
गेल्या २० वर्षांपासून या संबंधित भागातून श्रीराम यांची विवाह यात्रा निघते. मात्र असे आतापर्यंत कधीच झाले नव्हते. जेव्हा मशिदीजवळ यात्रा पोहोचली असता, काही कट्टरपंथींनी लाठ्या काठ्यांनी वापर करत दगडफेक करण्याचे काम केले.