दिल्लीत बांगलादेशी दूतावासांविरोधात मोर्चा काढणार, राजीव जैन यांचा निषेध
07-Dec-2024
Total Views |
ढाका : शेख हसीना यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर अन्याय आणि अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आहे. बांगलादेशी हिंदूंविरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक राजीव जैन, माजी मुत्सद्दी वीणा सिक्री यांच्यासह अनेक सेवानिवृत्त नोकरदारांनी बांगलादेशी सरकारचा निषेध केला आहे.
त्यांचा हा निषेध नोंदवण्यासाठी नागरी समाज १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे बांगलादेश दूतावासांविरोधात निषेध मोर्चा काढणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरआतापर्यंत असंख्य हिंदू महिलांवर अत्याचार झाले आहेत.
तर आता इस्कॉनचे धर्मगुरू चिन्मदास कृष्णा यांना अटक करण्यात आली होती. चिन्मय दास यांना जामिन मिळावा या हेतूने एका वकिलाची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा वकील प्रभू रॉय यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात होता. चिन्मयदास कृष्णा यांना कोणताही न्याय मिळू नये, हे या मागील उद्दीष्ट साध्य करत त्यांनी हल्ला केला.
बांगलादेशी हिंदूंवरील अराजकता अद्यापही कायम आहे. बांगलादेशी हिंदूंना आपला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.