भव्य श्रीराम मंदिराच्या रंगमंडपाचा कळस पूर्णत्वास

    11-Dec-2024
Total Views | 64
Sree Ram Mandir

नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या ( Shri Ram Mandir ) पाच मंडपांपैकी रंगमंडपाच्या कळसाची उभारणी पूर्णत्वास गेली आहे.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे महिन्यानंतर जानेवारीमध्ये प्राणप्रतिष्ठा वर्धापनदीन अर्थात 'प्रतिष्ठा द्वादशी'चा सोहळा समारंभपूर्वक साजरा होणार आहे. त्याची संपूर्ण रूपरेषा तयार करण्यासाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

मंदिर संकुलातील सप्तर्षी मंदिर, शिव, सूर्य, दुर्गा देवी, अन्नपूर्णा, गणपती आणि मारुती आदी मंदिरांच्या बांधकामातही प्रगती होत आहे. नुकतीच बांधकाम समितीचे सभापती नृपेंद्र मिश्रा यांनी बांधकामाचा आढावा घेतला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121