भूमीपूजन सुरू असताना हिंदू पंडितांवर हल्ला

पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

    16-Nov-2024
Total Views | 182
 
Hindu Pandit
 
पाली : राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जमिनीच्या वादातून पंडित ओम दत्ता यांच्यावर सुंदरकांड पुजा करत असताना हल्ला केला आहे. जुना बागडी भागात हा हल्ला झाला आहे. जिथे जमिनीचे मालक ओम दत्त यांनी कोर्ट कचेरी खेळत आपली न्यायालयीन लढाई जिंकली. त्यानंतर भूमीपूजा झाली होती त्यानंतर त्यांच्यावर लाठी आणि रॉडने हल्ला करण्यात आला. त्यामुळे ते जागीच जमखी झाल्याचे वृत्त आहे.
 
मिळालेल्या वृत्तानुसार, पंडित ओम दत्त सुंदरकांड येथे पठण करत असताना हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांपैकी, सुरेश, मुकेश, रमेश आणि किशन अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चार आरोपींना अटक केली. अनेक दिवसांपासून हा वाद सुरू झाला असून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी पंडित ओमदत्तवर हल्ला करण्याआधीच कट रचण्यात आला होता. या घडलेल्या घटनेनंतर स्थानिक लोकांनी आणि पंडित ओमदत्त यांच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत निदर्शने केली आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121