इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला! हवाई सुरक्षा यंत्रणांवर कारवाईनंतर क्षेपणास्त्र आणि उडवले ड्रोननिर्मिती केंद्र

    26-Oct-2024
Total Views | 202
 
IRAN
 
जेरुसलेम : ( Israel-Iran War ) इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायल या हल्ल्यानंतर इराणवर पलटवार कधी करणार, या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याची अत्यंतिक गोपनीय माहिती उघडकीस आल्याने जगभर खळबळ उडाली होती. अखेर इस्रायलने शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भीषण हवाई हल्ला करत इराणच्या सततच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
 
हा हल्ला इराणच्या लष्करी तळांवर करण्यात आला आहे. इस्रायलने या हल्ल्याला 'Operation Days of Repentance' असे म्हटले आहे. इराणची राजधानी, तेहरान आणि जवळपासच्या भागांवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात इराणचे नेमके किती नुकसान झाले या बाबत इस्रायलने अद्याप माहिती जारी केली नाही. मात्र, इराणच्या लष्करी ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) म्हटलं असून याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
 
आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, "इस्रायल राज्याविरुद्ध इराणमधील राजवटीच्या अनेक महिन्यांच्या सततच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायल संरक्षण दल इराणमधील लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ले करत आहेत. इस्रायल आणि इस्रायलच्या जनतेच्या रक्षणासाठी आम्ही जे आवश्यक ते करू." असेही त्यांनी सांगितले.
 
इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलच्या संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला रणनीती आखण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान झाल्यास इराण याला प्रत्युत्तर देईल, असे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्रायलने महत्त्वाच्या पायाभूत सुविधा किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्यास इराणकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा देखील इराणने दिला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121