३६ वर्षानंतर भारताच्या भूमीतच न्यूझीलंडने टीम इंडियाला पाजलं पाणी
न्यूझीलंडचा टीम इंडियावर ऐतिहासिक विजय
20-Oct-2024
Total Views | 36
बंगळुरू : न्यूझीलंड विरुद्ध भारत (Newzealand Vs India) कसोटी सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला धुळ चारली आहे. बंगळुरू येथे न्यूझीलंडने ८ गडी राखून टीम इंडियाचा पराभव केला आणि ३६ वर्षानंतर भारताच्या भूमीवर कसोटी सामन्यात विजयाची नोंद केली आहे. खरं तर हा न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय आहे. न्यूझीलंडने १९८८ साली भारतात पहिला कसोटी सामना विजयी झाला होता. मात्र त्यानंतर २० ऑक्टोबर २०२४ मध्ये टीम इंडियाविरुद्ध भारतात खेळत असताना न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
सामान्याच्या पाचव्या दिवशी भारताने न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे न्यझीलंडने केवळ २१.४ षटकांत पूर्ण केले. जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी उत्कृष्ठ गोलंदाजी केली होती ८ षटकात २९ धावा देत २ बळी घेतले, पण त्याची कामगिरी विजयासाठी पुरेशी ठरली नाही.
न्यूझीलंडसाठी, विल यंगने ४८ धावांची नाबाद खेळी खेळली आणि त्याच्यासोबत रचिन रवींद्रने नाबाद ३९ धावा करत दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी खेळत असताना ७५ धावांची भागीदारी करत संघाला विजयच्या शिखरावर नेले. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करत भारताचा डाव सामन्याचा टर्निग पॉइंट ठरला. न्यूझीलंडने भारताला सर्व विभागांमध्ये पराभूत केले आणि हा विजय कर्णधार टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील आहे.
याआधी न्यूझीलंडने १९६९ मध्ये नागपुरात आणि १९८८ मध्ये मुंबईत भारताचा पराभव केला होता. आता बंगळुरू येथील विजयात न्यूझीलंडचा तिसरा कसोटी कर्णधार टॉम लॅथमच्या नावाची भर पडली आहे, ज्याने टीम इंडियाला पराभूत केले. आता दुसरा कसोटी सामना हा पुणे येथे २४ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे.