सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

    01-Oct-2024
Total Views | 74

rajanikanth 
 
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चेन्नई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. पोट दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटात खूप दुखत असल्याची तक्रार त्यांनी केल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती चेन्नई पोलिसांनी दिली.
 
 
 
तसेच, ७३ वर्षीय रजनीकांत यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर एक नियोजित शस्त्रक्रिया होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप त्यांच्या कुटुंबियांकडून याबद्दल प्रतिक्रिया आली नाही. सीएनएन न्यूज १८ च्या वृत्तानुसार, रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत “सगळं ठीक आहे”, इतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, रजनीकांत यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच चाहते सोशल मीडियावर रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121