राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आलिया-रणबीरलाही निमंत्रण!
08-Jan-2024
Total Views | 83
मुंबई : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला संपन्न होणार असून या दिवसाची प्रत्येक रामभक्त आतुरतेने वाट पाहात आहे. या सोहळ्याचे निमंत्रण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना दिले जात आहे. यात हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा देखील समावेश आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांना देखील नुकतेच निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, कोकण प्रांत प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांच्या उपस्थितीत आलिया व रणबीरला श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे.
Actors Ranbir Kapoor and Alia Bhatt received an invitation to attend the consecration ceremony of Ram Temple on January 22nd in Ayodhya. pic.twitter.com/UaQD2xYpd8