मुंबई : 'जीवन प्रबोधिनी ट्रस्ट मुंबई'चे संस्थापक सत्यवान अंबरनाथ नर यांची श्री गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट जे. जे. हॉस्पिटल, मुंबई या संस्थेत संस्थेचे 'हितचिंतक' म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र धर्मशाळेचे ट्रस्टी एकनाथ ठाकूर यांनी सत्यवान नर यांना दिले.
सत्यवान नर हे श्री गाडगे महाराज धर्मशाळा जे. जे. हॉस्पिटल कंपाऊंड ट्रस्ट भायखळा, मुंबई या संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासुन रूग्ण सेवेचे आणि संस्थेचे इतरही सेवेचे काम करित आहेत. तसेच संत गाडगे बाबांच्या संदेशापमाणे गोरगरिबांची सेवा, अनाथ अपंग मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, वस्त्रदान, तसेच इतर विविध सेवापयोगी समाजकार्य जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या माध्यमातुन मुंबई व मुंबई बाहेरही करित आहेत. त्या अनुषंगाने त्यांची संत गाडगे बाबांनी स्वतः स्थापन केलेल्या धर्मशाळेत संस्थेचे 'हितचिंतक' म्हणुन पुढील पाच वर्षासाठी संस्थेच्या ट्रस्टींनी एकमताने नियुक्त केले आहे. याबाबत सत्यवान नर यांनी धर्मशाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच धर्मशाळेच्या हितासाठी आणि सेवा कार्यासाठी नेहमीच सहकार्य देऊ असे आश्वासन दिले.