आदित्य ठाकरेंचे सहकारी सूरज चव्हाण यांना ७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी
25-Jan-2024
Total Views | 33
मुंबई : आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवार, दि. २५ जानेवारी त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील 'पीएमएलए' कोर्टात हजर केले असता, न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
खिचडी घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सूरज चव्हाण यांना १७ जानेवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना दोनवेळा ईडी कोठडी, तर आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुरज चव्हाण यांना राजकीय पाठबळ असल्याने महापालिकेने त्यांना खिचडीचे कंत्राट दिले गेले. हे कंत्राट ८.६४ कोटींचे असून, एकूण घोटाळा ६.३ कोटींचा आहे. सुरज चव्हाण यांच्या बँक खात्यात १.३५ कोटी जमा कसे झाले, हे शोधायचे आहे. १६.३० रुपयांची खिचडी ३३ रुपयांना विकली. पैशातील हा फरक कसा आला आणि या पैशाचे काय? घोटाळ्यातील कागदपत्रे, बँक खाती व अन्य कोणा व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग आहे का, याची चौकशी करायची असल्याचा दावा ईडीतर्फे करण्यात आला.