रामलल्लांची मूर्ती निश्चित; प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेल्या मूर्तीची झाली निवड
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी "एक्स" वर पोस्ट करत मूर्तीची निश्चिती झाल्याची माहिती दिली
02-Jan-2024
Total Views | 215
( प्रतिकात्मक छायाचित्र )
लखनौ: अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराममंदीरीत विराजमान होण्यासाठी मूर्ती निश्चित करण्यात आली आहे. ही मूर्ती आपल्या देशाचे प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी केली आहे.
ते मुळचे कर्नाटकचे आहेत.
राममंदीरासाठी एकुण तीन मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. तीन पैकी एका मूर्तीची निवड केली जाणार होती. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी कर्नाटकातील निळ्या दगडापासून बनवलेल्या दर्शवली. इतर दोनमूर्ती पैकी एक दक्षिण भारतीय शैलीतली आणि दुसरी पांढर्या संगमरवराची होती. या दोन्ही मूर्ती सुद्धा राममंदीरात बसवण्यात आल्या आहेत. पण त्या कोठे बसवणार यावर निर्णय झालेला नाही. अशी माहीती आहे.
केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी ने ट्वीट किया, "अयोध्या में भगवान राम की प्राण प्रतिष्ठा के लिए मूर्ति के चयन को अंतिम रूप दे दिया गया है। हमारे देश के प्रसिद्ध मूर्तिकार योगीराज अरुण द्वारा बनाई गई भगवान राम की मूर्ति अयोध्या में स्थापित की जाएगी।"
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 'एक्स' वर पोस्ट करत मूर्तीची निश्चिती झाल्याची माहिती दिली आहे. "जिथे राम आहे तिथे हनुमान आहे. योगीराज अरुण यांनी कोरलेली रामाची मूर्ती अयोध्येत बसवली जाणार आहे. राम हनुमानाच्या अतूट नात्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकची रामलल्लांसाठी ही महत्त्वाची सेवा आहे" असे ते म्हणाले. ही मुळ पोस्ट कन्नड भाषेतील आहे.
"ಎಲ್ಲಿ ರಾಮನೋ ಅಲ್ಲಿ ಹನುಮನು"
ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮನ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ವಿಗ್ರಹ ಆಯ್ಕೆ ಅಂತಿಮಗೊಂಡಿದೆ. ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಹೆಸರಾಂತ ಶಿಲ್ಪಿ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಶ್ರೀ @yogiraj_arun ಅವರು ಕೆತ್ತಿರುವ ಶ್ರೀರಾಮನ ವಿಗ್ರಹ ಪುಣ್ಯಭೂಮಿ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗೊಳ್ಳಲಿದೆ. ರಾಮ ಹನುಮರ ಅವಿನಾಭಾವ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ ಇದು… pic.twitter.com/VQdxAbQw3Q
यापुर्वी नेपाळहून मूर्ती बनवण्यासाठी दोन मोठे खडक पाठवण्यात आले होते. पण ते शाळिग्राम खडक होते. ज्यांना विष्णूच रूप मानलं जातं त्यामुळे आणि ते खडक मूर्ती बनवण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या योग्य नसल्याने त्यापासून मूर्ती बनवण्यात आल्या नाहीत. भारतभरातुन तीन वेगवेगळ्या खडकांची व मूर्तीकारांची निवड करुन मुर्ती बनण्यात आल्या व त्यातील योगीराज यांची कर्नाटकातील निळ्या खडकापासून बनलेली मूर्ती निश्चित करण्यात आली.
मूळ मूर्ती ही पाच वर्ष वय असलेल्या रामलल्लांची असावी ज्यामध्ये बालपणीच्या रामलल्लांची निरागसता असावी व ती ५१ इंच उंचीची कमळावर विराजमान मूर्ती असावी अशा सूचना मूर्ती बनवण्यापूर्वी शिल्पकारांना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच ही मूर्ती बनवण्यात आली आहे. पण मूर्तीचे मूळ छायाचित्र अद्याप दाखवण्यात आलेले नाही.