'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी केंद्र सरकार आणणार नवे विधेयक?

    05-Sep-2023
Total Views | 54
 
INDIA allience
 
 
मुंबई : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला धक्का देण्यासाठी केंद्र सरकारने नवी रणनीती आखल्याची माहिती मिळते आहे. संसदेचं १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार असल्याची चर्चा आता सुरु आहे. या अधिवेशनात इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय घटनेमधून इंडिया शब्द कायमचा हटवण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केल्याची माहिती आहे.
 
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनीही भारतीय राज्यघटनेतून इंडिया शब्द हटवण्याची मागणी केली. हा शब्द वसाहती गुलामगिरीचे प्रतीक म्हणून काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
चंद्रयान-3 आणि आदित्य एल-1 सौर मोहिमेच्या यशांवरही विशेष अधिवेशनादरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. यादरम्यान काय होणार याबाबत केवळ अंदाज बांधला जात आहे. या चर्चांमध्ये रोहिणी आयोगाच्या अहवालापासून ते 'वन नेशन-वन इलेक्शन' आणि सभागृह नव्या संसदेकडे हलवण्यापर्यंतची चर्चा आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121