मुंबई : नायजेरियाच्या वायव्येकडील कडुना राज्यातील एका मशिदीवर अज्ञात सशस्त्र गटाने हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे सात नमाजींचा मृत्यू झाला आहे. कडुना पोलिसांचे प्रवक्ते मन्सूर हारुना यांनी सांगितले की, राज्याच्या इकारा स्थानिक सरकारी क्षेत्रातील दुर्गम साया गावात शुक्रवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला. यावेळी मशिदीत सर्व नमाजासाठी मशिदीमध्ये आलेले होते.
गावातील एका रहिवाश्यांने सांगितले की, "हल्ल्यादरम्यान जखमी झालेल्या दोन लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच जणांना मशिदीच्या आत नमाज पठण करत असताना गोळ्या घातल्या गेल्या आणि इतर दोन लोकांना बाहेर गोळ्या घातल्या गेल्या.
नायजेरियाच्या उत्तर-पश्चिम भागात गेल्या तीन वर्षांपासून दहशतवाद्यांनी हैदोस घातला आहे. या दहशतवाद्यी टोळ्यांनी आतापर्यंत हजारो लोकांचे अपहरण केले आहे. शेकडो लोकांना मारले आहे. त्यामुळे आफ्रिका खंडातील नायजेरिया देशात सध्या अशांततेचे वातावरण आहे.