मुंबई : केंद्र सरकारकडून विशेष अधिवेशनाची घोषणा करत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा घडवून आणली. या चर्चासत्रात विरोधी पक्षाकडून सहभाग नोंदवला गेला. यातच बहुजन समाजवादी पार्टी खासदार संगीता आझाद यांनी महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत सहभाग घेत या विधेयकास समर्थन दिले.
दरम्यान, बसपा खासदार संगीता आझाद म्हणाल्या, "या विधेयकामुळे देशातील महिलांना नवी ऊर्जा मिळेल. आम्ही या विधेयकाला पाठिंबा देतो, पण आमच्या काही मागण्या आहेत. आम्हाला लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभेतील आरक्षण ३३ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवून हे आरक्षण विधान परिषदांमध्ये लागू करण्यात यावे, अशी मागणी आझाद यांनी संसदेत यावेळी केली.
त्या पुढे म्हणाल्या की, जात जनगणना लवकरात लवकर व्हावी आणि त्यासोबतच सीमांकनही लवकर व्हावे. हा केवळ सरकारचा निवडणुकीचा मुद्दा बनू नये आणि २०२४ च्या निवडणुकीत हे आरक्षण लागू केले जावे, असेही बसपा खा. संगीता आझाद म्हणाल्या.