चांद्रयान, विक्रम आणि प्रज्ञान! कुठून आलीत ही नावं? वाचा सविस्तर..

    30-Aug-2023
Total Views | 142

Chandrayan-3


मुंबई :
चांद्रयान-३ च्या मोठ्या यशानंतर भारताने जगात इतिहास घडवला आहे. या यशाबद्दल जगभरात भारताचे कौतुकही होत आहे. चांद्रयान-३ मोहिमेतील महत्त्वाचे आणि लक्ष वेधून घेणारे शब्द म्हणजे विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर आणि विकास इंजिन. चांद्रयान-३ मधील काही भागांना हीच नावे का दिलीत? या नावांचा अर्थ काय? ही नावे कुठून आलीत? या सगळ्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
 
चांद्रयान-३ - संस्कृतमध्ये चांद्रयान या शब्दाचा अर्थ चंद्रावर जाणारे वाहन असा होतो. भारताच्या चंद्रावर जाणाच्या मोहिमेकरिता चांद्रयान हे नाव अगदी साजेसं असल्याने या मोहिमेला चांद्रयान-३ असे नाव देण्यात आले.
 
विक्रम लँडर - चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरुन इतिहास घडवणाऱ्या विक्रम लँडरमधील विक्रम या शब्दाचाही विशेष अर्थ आहे. विक्रम शब्दाचा संस्कृतमधील अर्थ शुर किंवा धाडसी असा होतो. यासोबतच भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरुन देखील हे नाव दिले असल्याचे सांगण्यात येते.
  
प्रज्ञान रोव्हर - चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणाऱ्या प्रज्ञान रोव्हर या शब्दाचादेखील विशेष अर्थ आहे. संस्कृतमध्ये प्रज्ञान शब्दाचा अर्थ बुद्धी असा होतो.
 
विकास - विकास हे चांद्रयान-३ मधील इंजिन आहे. विकास या शब्दाचा अर्थ पुढे जाणे असा होतो.
 
चांद्रयान-३ च्या यशानंतर आता भारताने सुर्य मोहिमही हाती घेतली आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ हे भारताचे पहिले सुर्ययान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121