मोदी सरकारचा मोठा निर्णय! गॅस सिलेंडर स्वस्त होणार

    29-Aug-2023
Total Views | 130

Gas cylinders 
 
 
नवी दिल्ली : महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी घट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. एलपीजी सिलेंडरच्या दराचा आज आढावा घेण्यात आला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १०० रुपयांनी कमी केली होती. पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता.
 
पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित करतात. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी स्पष्ट केले होते. इतर कोणालाही स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर अनुदान दिली जाणार नाही.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121