Mazagon Dock Bharti 2023; १० वी ते पदवीधारकांना नोकरीची संधी

    14-Aug-2023
Total Views | 99
Mazgaon Dock Ship Builders Limited Recruitment

मुंबई
: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे अर्ज मागविण्यात आले आहेत. नॉन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. तसेच, या भरतीद्वारे एकूण ५३१ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकवर त्यांचे अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख जाहीर केलेली असून २१ ऑगस्ट २०२३ असणार आहे. या भरतीप्रक्रियेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट www.mazagondock.in ला भेट द्या.

दरम्यान, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई मधील रिक्त पदांसाठीच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे की, "नॉन एक्झिक्युटिव्ह" च्या विविध रिक्त ५३१ पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीकरिता शैक्षणिक पात्रता ही ८वी, १०वी, आयटीआय डिप्लोमा, किंवा पदवीधर असून हे अर्ज करु शकणार आहेत.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार असून सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एएफसी श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी आणि एसटी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. याभरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे निश्चित करण्यात आले असून अर्ज ऑनलाईन पध्दतीने कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहे. तसेच, उत्तीर्ण उमेदवारास नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.



 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121