मुंबई : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली असून अनेकांना याकरिता ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून अनेक पदांकरिता जाहिरात काढण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरु झाली असून अंतिम तारीख १६ ऑगस्ट असणार आहे. तसेच, याकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.ippbonline.com या अधिकृत बेवसाईटवर करु शकता.
दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी १६ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही भरती प्रक्रिया एक्झिक्युटिव्ह पदाच्या १३२ जागांसाठी करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे आहे.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाइन माध्यमातून करावा लागेल.