आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बाईपण...’ चित्रपटाची ८३ कोटींची यशस्वी कमाई
31-Jul-2023
Total Views | 92
मुंबई : मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतर भाषिक चित्रपटांसोबत भरघोस कमाई करताना दिसत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटाने तर अनेक काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केली आहे. मात्र आता या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख याच्या 'वेड' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. सोबतच कमाईच्या बाबतीत हा चित्रपट चक्क मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणारा सैराट चित्रपटानंतर दुसरा चित्रपट ठरला आहे.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच १२ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात ही कमाई वाढून तब्बल २४ कोटींवर गेली. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा या चित्रपटाने २१ कोटी आणि चौथ्या आठवड्यात १० कोटींची कमाई केली. आता पुढच्या आठवड्यात मिळून ही कमाई तब्बल ८३ कोटी ५० लाखांवर पोहोचली आहे. ही कमाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमाई आहे. 'वेड' ने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळून ७५ कोटींची कमाई केली होती.