‘बाईपण भारी’ची जादू कायम, पार केला ६० कोटींचा टप्पा

    25-Jul-2023
Total Views |

baipan bhari deva





मुंबई :
‘बाईपण भारी देवा’ या केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाने मराठी चित्रपटांना एक नवी उमेद दिली आहे. ३० जून रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसच्या कमाईचा आलेख चढताच दिसत आहे. चौथ्या आठवड्यातही बाईपणची बॉक्स ऑफिसवरील जादू अजूनही कायम आहे. दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण ६५.६१ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’ची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून केदार शिंदेही भारावून गेले आहेत.
 
काय आहे केदार शिंदे यांची पोस्ट?
 
“ही तर श्री स्वामींची कृपा...हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद...मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. ‘सैराट’नंतरचा ‘बाईपण’ ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा...”, असं केदार शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.
 
 

kedar shinde