स्टँडअप कॉमेडियन नवीन प्रभाकर आता रंगभूमी गाजवण्यास सज्ज

    03-Jul-2023
Total Views | 130
 
navin prabhakar
 
 
मुंबई : विनोदी कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा विनोदी कलाकार नवीन प्रभाकर एका नव्या व्यासपीठावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम करत आता नवीन नाटक विश्वात पदार्पण करणार आहे. 'कॉमेडी नाइट्स' या कार्यक्रमातून नवीन प्रभाकर पहिल्यांदाच रंगभूमीवर येत असून, लवकरच पहिल्या प्रयोगाची घोषणा करण्यात येणार आहे.
 
 
कॉमेडी नाइट्स या कार्यक्रमाची निर्मिती प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि प्रतिक मेहता यांनी केली आहे. दरम्यान, नवीन प्रभाकरसह या कार्यक्रमात राजकुमार रँचो आणि नितीन भंडारकर यांचाही सहभाग आहे. नवीन प्रभाकरने आतापर्यंत स्टँडअप कॉमेडीचे तीन हजारहून अधिक कार्यक्रम यशस्वीरित्या सादर केले आहेत. त्यामुळेच आता रंगभूमीवर येत असलेल्या नवीन प्रभाकरच्या कॉमेडी नाइट्स कार्यक्रमाविषयी त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121