'छोटी घटना आहे': कॉलेजमधील विद्यार्थिनींच्या व्हिडिओवर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचे लाजिरवाणे विधान

    27-Jul-2023
Total Views | 322
uddapi  
 
बंगलोर : कर्नाटकातील उडुपी येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाथरूममध्ये हिंदू विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी पोलिसांनी तीन मुस्लिम विद्यार्थिनींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दुसरीकडे, काँग्रेसशासित कर्नाटक सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा म्हणाले की, उडुपीची घटना अतिशय छोटी आहे आणि त्याला राजकीय रंग देण्याची गरज नाही.
 
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांच्या या विधानावर आता टीका होत आहे. गृहमंत्री असून पण ते अशी बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. उडुपी येथील घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य खुशबू सुंदर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज उडुपीला पोहोचणार आहेत.
 
या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले आहेत. एका प्रकरणात तीन विद्यार्थिनी आणि कॉलेज प्रशासनाने टॉयलेटमध्ये व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. तर दुसरे प्रकरण यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करण्याशी संबंधित आहे. या प्रकरणात अलीमातुल शफा, शबानाज आणि आलिया यांना आरोपी बववण्यात आले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121