'सुरक्षित राहायचे असेल तर राज्य सोडा': आता मिझोरामच्या मैतई समुदायाला धमकी!
22-Jul-2023
Total Views | 422
नवी दिल्ली : एकीकडे मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मिझोराममधील मैतई समुदायाला आता धमक्या आल्या आहेत. मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ST (अनुसूचित जमाती) दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितले होते, ज्यामध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे कुकी समाजातून संताप व्यक्त होत आहे. आता मिझोराममधील मैतई समुदयाला धमकी मिळाली आहे. जर त्यांना त्यांच्या जीवावर प्रेम असेल तर त्यांनी राज्य सोडावे, अशा स्वरुपाची धमकी मैतई समुदायाला देण्यात आलेली आहे.
जाहीरपणे दिलेल्या या धमकीमध्ये मैतई समुदायाने मिझोराम सोडावे, असे म्हटले आहे. यानंतर मिझोरम सरकारने राजधानी ऐजॉलमध्ये राहणाऱ्या मैतई लोकांची सुरक्षा वाढवली आहे.‘पीस एकॉर्ड MNF रिटर्नीज असोसिएशन (PAMRA)’नावाच्या संघटनेने हे धमकीचे निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, मिझोराममध्ये राहणार्या मैतई समुदायाला त्यांच्या सुरक्षेची काळजी असेल तर त्यांनी लवकरात लवकर हे राज्य सोडून दुसरीकडे जावे.
शेजारच्या मणिपूर राज्यात महिलांची नग्न परेड आणि सामूहिक बलात्काराचे व्हिडिओ समोर आल्यानंतर मिझोराममधील तरुणांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. PAMRA ही संघटना दहशतवाद्यांची संघटना होती. ज्यांनी शस्त्राचा त्याग केल्याचा दावा केला होता. ती एक बिगर-राजकीय संघटना म्हणून स्वतःचे वर्णन करते. शांतता करारातील सर्व कलमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेने म्हटले की, मणिपूरमध्ये कुकी समुदायाविरोधात हिंसाचार झाला असून यामुळे मिझोराममधील तरुण दुखावले आहेत.
मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतई समुदायाच्या लोकांना काही झाले तर त्याला ते स्वत: जबाबदार असतील, अशी धमकीही त्यांनी दिली. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारशीही चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. मिझो कुकी वंशाचे असल्याचे वर्णन करून, पुर्व अतिरेकी संघटनेने म्हटले आहे की केवळ मणिपूरच्या मैतईंना राज्य सोडण्यास सांगितले गेले आहे, इतर कोणालाही नाही. दरम्यान मणिपूरमध्ये विरोधी पक्ष सर्वपक्षीय बैठकीची मागणी करत आहेत.