मुंबई : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातले आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे हिमाचलमधील सर्व प्रमुख नद्यांना पुर आला आहे. या पुरामुळे हिमाचल प्रदेशमध्ये लोकांच जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांना पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी रेस्क्यू करण्यात आले आहे.
पुरामुळे आतापर्यत ३३३ घर वाहून गेली आहेत. तर ८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. सोबतच आतापर्यंत ९२ लोकांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे ४१ ठिकाणी भूस्खलन झाले आहे. तर २९ जागी फ्लॅश फ्लडचा घटना समोर आल्या आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे आतापर्यत हजारों कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या एनडीआरएफच्या टिम राज्यात जागोजागी तैनात करण्यात आल्या आहेत.