राऊतांनी शापित महामार्ग म्हणत बाळासाहेबांचा अवमान केलायं!
नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका
01-Jul-2023
Total Views | 102
मुंबई : "ज्या महामार्गाला नाव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं दिलेलं आहे. आणि त्यांच्या नावानी असलेल्या महामार्गाला शापित बोलणं हे बाळासाहेबांचा फार मोठा अपमान या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे." अशी टीका आं नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहे. समृद्धी महामार्ग बनत असताना सर्वांत पहिला विरोध कोणी केला? तर त्या संजय राजाराम राऊतच्या मालकांनी केला. असा हल्लाबोल ही त्यांनी यावेळी केला आहे.
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातानंतर समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे हे अपघात होत असल्याचं मला वाटतं, असं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या विधानाला नितेश राणेंनी चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे म्हणाले, "आजच सकाळी दुःखद बातमी म्हणजे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर जो एक अपघात झाला तिथे पंचवीस लोकांचं दुःखद निधन झालंय. त्या संबंधित मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे अन्य मंत्रिमंडळाचे सहकारी लवकरच तिथे पोहोचतायेत आणि योग्य ती मदत आणि सहकार्य आणि नेमका हा अपघात कसा झाला? या संदर्भात योग्य चौकशी करून कोणाच्या हातातून चूक झाली असेल तर शिक्षा हे आमचं सरकार निश्चित पद्धतीने देईल, असा माझा ठाम विश्वास आहे. झालेला अपघात हा अतिशय दुःखद निश्चित पद्धतीने आहे."
"पण त्यावरही घाणेरडं राजकारण आणि टिपणी हे संजय राजाराम राऊतनी पत्रकार परिषदेमध्ये केली. ज्या महामार्गाला नाव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं दिलेलं आहे. ज्या बाळासाहेबांना आम्ही सगळे दैवत मानतो. आणि त्यांच्या नावानी असलेल्या महामार्गाला शापित बोलणं हे बाळासाहेबांचा फार मोठा अपमान या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे." असं राणे म्हणाले.