मंदिरातील वस्त्रसंहितेचं सर्व हिंदूंनी स्वागत करायला हवं : नितेश राणे
30-May-2023
Total Views | 90
मुंबई : मंदिर समितीने घेतलेल्या ड्रेस कोडच्या निर्णयाचं प्रत्येक हिंदूंनी स्वागत केलं पाहिजे. असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंदिर समित्यांनी घेतलेल्या वस्त्रसंहितेच्या निर्णयाचे नितेश राणेंकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक हिंदूंनी आपल्या मंदिरात नियम पाळावेत असं आवाहनही त्यांनी केलं.
नितेश राणे म्हणाले, "राज्यभरातल्या मंदिर समित्यांनी पुढाकार घेऊन मंदिरामध्ये कपड्यांच्या आचारसंहितेबद्दल जो काय निर्णय घेतला आहे तो निश्चित पद्धतीने स्वागतार्ह्य आहे. हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे. ज्या अर्थी हिजाब घालण्यावर त्या त्या धर्माचे लोकं अतिशय कडक भूमिका घेतात. कुठलंही तडजोड करत नाही. त्याचपद्धतीने प्रत्येक हिंदूने आपण आपल्या मंदिरामध्ये आचारसंहिता पाळावी. आणि त्याहीबद्दल काही तडजोड करता कामा नये." अशी प्रतिक्रिया राणेंनी यावेळी दिली.