केंद्र सरकारचा पुन्हा केजरीवाल यांना धक्का!

    20-May-2023
Total Views | 211
modi-government-ordinance-on-sc-st-act-before-delhi-transfer-posting-issue-lg-vs-arvind-kejriwal

नवी दिल्ली : सर्वेाच्च न्यायालयाने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार हे दिल्ली सरकार असल्याचा निर्णय दिला होता. मात्र आता हा निर्णय केंद्र सरकारने फिरवला आहे. त्यांनी हे अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार नायब राज्यपाल विनय कुमार यांच्याकडे ठेवण्याचा अध्यादेश काढला आहे. दिल्लीत महत्तवाचे कार्यलये असून त्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे केंद्राने अध्यादेशात म्हटले आहे.

याआधी दिल्लीत नायब राज्यपाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात सुरू असलेल्या हक्काच्या लढाईवर सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टी सरकारच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एका अध्यादेशाद्वारे बदलला आहे. या अध्यादेशाद्वारे दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार केजरीवाल सरकारऐवजी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे राहणार आहेत.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121