उध्दव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हमुळे हजारोंचे प्राण वाचले!

- आदित्य ठाकरे

    05-Apr-2023
Total Views | 53
 
 Aaditya Thackeray
 
 
ठाणे : ठाण्यात महाविकास आघाडीची 'जनप्रक्षोभक यात्रा' सुरु झाली आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड मोर्चात सहभागी झाले आहेत. ठाण्याच्या शिवाजी मैदानातून हा मोर्चा काढयात आला आहे. तर मविआच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावेळी आदित्य ठाकरे सभेदरम्यान म्हणाले, "उध्दव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हमुळे हजारोंचे प्राण वाचले आहेत."
 
"फेसबूक लाईव्ह करत त्यांनी देशाचे पंतप्रधान बदलून टाकले, दिल्लीत जात त्यांनी ठाकरे अडनाव मिळते का याची चाचपणी देखील केली. पुण्यात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये पाठवला, अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले, अजून किती प्रकल्प त्यांना देणार?" असा संतप्त सवालही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
 
गुजरातला दोन मुख्यमंत्री मिळाले आहे, आम्हाला एकतरी मुख्यमंत्री द्यावर अशी खोचक टीकाही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे. आदित्य म्हणाले, "आम्ही लवकरच येणार असून गद्दारांना त्यांची जागा दाखवणार आहोत. या सरकारच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या शहरात जर अशी घटना घडली असली तरी त्यांना काही वाटत नाही. ठाण्याला तुम्ही देशभरात बदनाम केले, माफीचा व्हिडिओ बनवून घेतला तरी तिच्या पोटात लाथा मारल्या गेल्या. ठाण्यात येऊन मी जिंकून दाखवणार." असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
 
रोशनी शिंदे प्रकरणावर पुढे बोलताना ते म्हणाले, "चोराचा पक्ष कधी असू शकतो का? ती टोळी आहे. शिंदेच्या लोकांनी महिलेवर हात उचलले जातात, तिची तक्रार दाखल करुण घेतली जात नाही. महाराष्ट्रातले नाही तर गुवाहटीचे मुख्यमंत्री आहे, आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण जे करणे गरजेचे आहे, ते करणारच. आमचे सरकार येताच सर्व जणांची चौकशी लावणार." असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवा सुरू केली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रो-रो सेवेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणवासीयांना आणि पर्यटकांन..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121