पुरी : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दि.११ एप्रिल रोजी ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील झामू यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी पुजेदरम्यान सुमारे १० मीटर जळत्या कोळश्यावर ते अनवाणी धावले. त्याचा २४ सेकंदांचा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.व्हिडिओमध्ये अंगारावर धावताना त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. त्याला पाहून गावकरीही खूश दिसत आहेत.
पूजेनंतर पात्रा म्हणाले की , ' शक्ती पूजा आपल्या सनातन संस्कृती आणि पंरपरेचा महत्त्वाचा भाग आहे,या तीर्थयात्रेत अग्नीवर चालून आईची पूजा केली जाते,यामुळे मला आशीर्वाद मिळाला,' असे पात्रा म्हणाले. तसेच लोकांच्या कल्याणासाठी आणि प्रदेशात शांतता नांदावी यासाठी आईकडून आशीर्वाद मागितला असल्याचे पात्रा यांनी सांगितले.