मालेगाव : शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे त्यांनी कोणत्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल , असा खळबळजनक आरोप केला आहे. नाशिकमधील मालेगाव सभेत उद्धव ठाकरे यांनी एका कांद्याची ५० खोक्यांना खरेदी झाली, अशी टीका केली होती.त्यावरुन सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
आमदार सुहास कांदेनी यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत म्हणाले की, आम्ही एक रुपया घेतला असेल तर आमची नार्को टेस्ट करा. आमची नार्को टेस्ट जाहीरपणे कॅमेरा लावून करा. आम्ही खोका सोडा एक रुपया घेतला असेल, तर सत्य समोर येईल.तसेच उलट सत्य बाहेर यावे म्हणून उद्धव ठाकरे यांचीच नार्को टेस्ट करा. म्हणजे उद्धव ठाकरेंनी कोणत्या कंपनीकडून किती पैसे घेतले, हे समोर येईल, अशी टीका ही सुहास कांदेनी केली.
तसेच सुहास कांदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नव्हे तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये, म्हणून राजीनामा दिला, असा दावाही सुहास कांदे यांनी केला.त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करणे बंद करावे.त्यामुळे पाटकरणांची ईडी चौकशी होऊद्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल, असे ही सुहास कांदे म्हणाले.