मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, "हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो." असे थेट आव्हानचं दिले होते. आदित्य यांचं हे आव्हान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी स्वीकारलं आहे. त्या म्हणाल्या, "पराभव व्हावा अशी तुमची इच्छाच असेल तर आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत. एकनाथ शिंदे यांना तुमच्या विरोधात लढण्याची गरज नाही." असं आव्हानच शीतल म्हात्रे यांनी दिलं आहे.
शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाल्या, "आदित्य ठाकरे तुम्ही वरळीतून आव्हान देत आहात हे ऐकलं. तुम्ही आव्हान देण्याची गरज नाही. एवढीच इच्छा असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कट्टर सैनिक आहेत, आमच्यासारखी लोकं ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत. आदित्यजी, तुम्हाला एक प्रश्न विचारते. वरळीतून आपल्याला 6 हजाराच्यावर नोटाची मते मिळाली आहेत. तुम्ही ज्या वरळीचे आमदार आहेत, तिथे तुमचं साधं जनसंपर्क कार्यालय नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचं असेल तर तुम्हाला भेटता येत नाही."
04 February, 2023 | 14:41
"अन् तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात. पण तुम्हाला त्या वरळीत दोन अधिक आमदार द्यावे लागले. एका वरळीत तीन तीन आमदार आहेत. तरी सुद्धा तुम्हाला माजी नगरसेवक संतोष खरात सारखी व्यक्ती ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आली." असा पलटवार त्यांनी केला.