राजा ठाकूरला सुपारी? राऊतांनी लिहीलं फडणवीसांना पत्र! प्रिय देवेंद्रजी....

खासदार राऊतांनी लिहीलं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

    21-Feb-2023
Total Views | 367
mp-shrikant-shinde-hire-goons-for-my-murder-sanjay-raut-allegation-wrote-letter-to-devendra-fadnavis-

मुंबई
: खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात राऊतांनी स्वतांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.



या पत्रात राऊत लिहताता की, प्रिय देवेंद्रजी, 'गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे', असे संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहलेल्या पत्रात म्हणटले आहे. मात्र ही माहिती राऊतांना कशी मिळाली ह्याबाबत राऊतांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या पत्रामुळे राजकीय क्षेत्रात भूंकप होण्याची शक्यता आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121