बॉलिवूडच्या चित्रपटांना टक्कर देत 'झिम्मा २' चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यात यशस्वी दौड सुरूच

    09-Dec-2023
Total Views | 48

jhimma 2 
 
मुंबई : हिंदी चित्रपटांना टक्कर देत सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत महाराष्ट्रातील चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लावत आहेत. ‘अॅनिमल’ आणि सॅम मानेकशॉ या दोन मोठ्या हिंदी चित्रपटांत आपले मराठीपण जपत झिम्मा २ ने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही 'झिम्मा २'ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत.
 
चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस 'झिम्मा २'बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटत आहे. खरंतर 'झिम्मा २'ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण 'झिम्मा'ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय 'झिम्मा २' सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही 'झिम्मा २'ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत 'झिम्मा २' स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.''
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121