हिवाळी अधिवेशनात ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर!

    07-Dec-2023
Total Views | 80

Fadanvis, Shinde & Narvekar

(उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर जी यांचे स्वागत केले)
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवार दि. ७ डिसेंबर रोजी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात पुरवणी मागण्यांसदर्भात निवेदन सादर केले.
 
यापैकी १९ हजार २४४. ३४ कोटींच्या मागण्या अनिवार्य खर्च, ३२ हजार ७९२.८१ कोटींच्या विविध कार्यक्रमांतर्गत, तर ३ हजार ४८३. ६२ कोटींच्या मागण्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आहेत. ५५ हजार ५२०.७७ कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४८ हजार ३८४.६६ कोटी इतका आहे.
 
अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक तरतूद ही सार्वजनिक बांधकाम विभागासाठी, ५ हजार ४९२ कोटी रुपये इतकीआहे. त्या खालोखाल कृषी - ५ हजार ३५१ कोटी, तर नगरविकास विभागासाठी ५ हजार १५ कोटी इतकी तरदूत करण्यात आली आहे.
 
खातेनिहाय पुरवणी मागण्या
 
सार्वजनिक बांधकाम विभाग - ५,४९२ कोटी
कृषी व पदुम विभाग - ५,३५१ कोटी
नगर विकास विभाग - ५,०१५ कोटी
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग - ४,८७८ कोटी
ग्रामविकास विभाग - ४,०१९ कोटी
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग - ३,५५५ कोटी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - ३,४९५ कोटी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग - ३,४७६ कोटी
इतर मागास बहुजन कल्याण विभाग - ३,३७७ कोटी
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - ३,०८१ कोटी
गृह विभाग - २,९५२ कोटी
आदिवासी विकास विभाग - २,०५८ कोटी
सार्वजनिक आरोग्य विभाग - १,३६६ कोटी
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग - १,१७६ कोटी
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग - ९९९ कोटी
महसूल व वन विभाग - ७८७ कोटी
जलसंपदा विभाग - ७५१ कोटी
उच्च व तंत्र शिक्षण विभाग - ७३६ कोटी
अल्पसंख्याक विकास विभाग - ६२६ कोटी
नियोजन विभाग - ६०० कोटी
विधि व न्याय विभाग - ४०८ कोटी
महिला व बाल विकास विभाग - ३७५ कोटी
वित्त विभाग - ३१६ कोटी
अग्रलेख
जरुर वाचा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहेत. य.ाअपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत,तसेच ही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व २६.३४ लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअ..

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

"राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. याॲपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121