पुणे : पुण्यातील गजबजलेल्या बाणेर-पाषाण रस्त्यावरील संस्थेजवळ मेट्रोचे पत्रे लावण्यासाठी काम सुरू असतना खोदाई दरम्यान एक हॅन्डग्रेनेड आढळून आल्याचे वृत्त आहे. हॅन्ड ग्रेनेड ब्रिटिश कालीन असल्याचे समजते मेट्रोकडून पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली.त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला असून कोणतेही भीतीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तात्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण केले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा हॅन्ड ग्रेनेड ताब्यात घेतला. तो जागेवरच निकामी करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हॅन्डग्रेनेड ब्रिटिश कालीन असून या ठिकाणी मेट्रोचे पत्रे लावण्याचे काम सुरू होते. त्याकरिता सुरू असलेल्या खुदाई दरम्यान हा हॅन्ड ग्रेनेड मिळून आला. तूर्तास घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.