श्रीरामाचे भजन आणि गाणी सोशल मिडीयावर शेयर करा; पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन
31-Dec-2023
Total Views | 111
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी देशातील जनतेशी मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. वर्षाच्या शेवटच्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने केलेला कामाचा आढावा घेतला. येत्या वर्षभरात देश अधिक चांगला होईल. अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. मन की बात या कार्यक्रमाची आज १०८ वी आवृत्ती होती.
जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले की, “१०८ क्रमांकाचे महत्त्व, त्याचे पावित्र्य हा गहन अभ्यासाचा विषय आहे. जपमाळात १०८ मणी, १०८ वेळा जप, १०८ दिव्य गोल, १०८ मंदिरात पायऱ्या, १०८ घंटा, १०८ ही संख्या अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच 'मन की बात' चा १०८ वा भाग माझ्यासाठी अधिक खास झाला आहे.”
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख करुन ते म्हणाले की, "रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा संपूर्ण देशात जल्लोष आणि उत्साह आहे. लोक आपल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत आहे. मागच्या काही दिवसांत श्रीराम आणि अयोध्यासंदर्भात अनेक नवीन गाणी आणि नवीन भजने रचली गेली आहेत. अनेकजण नवीन कविताही लिहित आहेत. त्यात अनेक अनुभवी कलाकार आहेत, तर नवीन उदयोन्मुख तरुण कलाकारांनी मनमोहक भजने रचली आहेत.
मन की बातमध्ये आवाहन करताना ते म्हणाले, “आपण सर्वांनी ही गाणी आणि कविता हॅशटॅग #shrirambhajan सह शेअर करा. श्री राम भजन हॅशटॅगसह सोशल मीडियावर तुमची निर्मिती शेयर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. भावनांचा आणि भक्तीचा हा संगम असा प्रवाह बनेल ज्यामध्ये सर्वजण रामात तल्लीन होतील.”